गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई
marathinews24.com
पुणे – Pune Pistol Seizure News : बेकायदा पिस्तूल बाळगून फिरणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे असा ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १८) चांद्रभागा चौकाजवळ केली.
अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी हे पथकासह १८ नोव्हेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना चंद्रभागा चौकाजवळ एकजण पिस्तूलासह थांबल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सराईत अर्थव मारणे याला ताब्यात घेतले. (Pune Pistol Seizure News) त्याच्याकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त केली. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, एपीआय स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक तेजश्री पवार, शंकर नेवसे, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, ओमकार कुंभार, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव, साधना ताम्हाणे यांनी केली.
आरोपीवर खून, आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल
आरोपी अथर्व मारणे सराईत असून, त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यातंर्गत खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच पिंपरी-िंचचवडमधील सांगवी, चिखली पोलीस ठाण्यातंर्गत आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यामुळे गंभीर गुन्हा टळला असून, गुन्हे शाखेचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.






















