Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Road Accident News : पुण्यात मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यू

Pune Road Accident News

मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Road Accident News : भरधाव मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी चौकात घडली. अपघातात रिक्षा चालक जखमी झाला. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता अनिल साठे (वय ५१, रा. टँक रस्ता, शांतीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ईश्वर येदू वाघमारे (वय ६५, रा. टँक रस्ता, शांतीनगर, येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर भागात घरफोडी;पावणेतीन लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर वाघमारे यांची मेहुणी संगीता साठे रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी सहाच्या सुमारास रिक्षातून कामावर निघाल्या होत्या. विश्रांतवाडीतील प्रादेशिक मनोरुग्णलय चौकात रिक्षाचालक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असताना भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. मोटारीच्या धडकेत रिक्षा उलटून प्रवासी साठे गंभीर जखमी झाल्या. अपघातात रिक्षा चालकाला दुखापत झाली. (Pune Road Accident News)  गंभीर जखमी झालेल्या साठे यांच्यासह रिक्षा चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Pune Road Accident News  कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दशरथ सहदेव प्रसाद असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत प्रसाद यांचे जावई सौरभ पंकज आवळे (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दशरथ प्रसाद हे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यावरुन निघाले होते. कोंढवा टपाल कार्यालयासमोरुन दुचाकीस्वार प्रसाद हे वळत होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार प्रसाद यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×