Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; बीजेएस आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या ४२ वर्षांच्या सामाजिक कार्याची घेतली माहिती

marathinews24.com 

पुणे – Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्या पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह संस्थेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – सविस्तर बातमी 

या प्रसंगी शाह यांनी, बीजेएस आणि एसएमएफ यांच्या ४२ वर्षांच्या प्रवासाची, सामाजिक योगदानाची आणि विविध उपक्रमांची माहिती घेऊन या संस्थांच्या कार्याचे कौतुक केले. मुथ्था यांनी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, मूल्यवर्धन कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली. कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त वल्लभ भन्साळी, अभय फिरोदिया, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांकला आदी उपस्थित होते.

सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालयास भेट

तत्पूर्वी  शाह आणि अन्य मान्यवरांनी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांचे पश्चिम विभागीय कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×