वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा; वाहतूक शाखेचे आवाहन
marathinews24.com
पुणे – Pune Traffic Diversion : शहरातील श्री शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मंगळवारी (१७ नोव्हेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
धनकवडीच्या शंकर महाराज मठात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दैनंदिनीचे प्रकाशन – सविस्तर बातमी
पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर ते अहिल्यादेवी चौकादरम्यान उड्डाणपुलाखालील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ‘बालाजीनगर परिसरातील अहिल्यादेवी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी पद्मावती, विणकर सभागृह, चव्हाणनगर, तीन हत्ती चौक, धनकवडी या मार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांनी पद्मावती परिसरातील स्वामी विवेकानंद पुतळा चौक येथून अहिल्यादेवी चौक, बालाजीनगरकडे जावे. (Pune Traffic Diversion ) मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केलेे आहे.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वाहन चालकांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन चालकांनी दुचाकी आणि मोटारी ठरवून दिलेल्या जागेत लावाव्यात. वाहने लावण्याची व्यवस्था शेतकरी हाॅटेल, टेंबे मळा परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, (दुचाकी आणि मोटार), सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटी परिसर, (दुचाकी), पद्मावती ते शारदा आर्केड बीआरटी मार्ग परिसर (दुचाकी) याठिकाणी केली आहे.






















