Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Crime News : तरुणाचा खुनाचा प्रयत्न; ५ जण अटकेत

Pune Crime News

मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी मांजरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मांजरी भागातील गोपाळपट्टी परिसरात ही घटना घडली. सिद्धार्थ बसवराज स्वामी (वय २७, रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण भारती, नीलेश कुतरवाडे, अखिलेश होनमाने, अभिषेक पात्रे, रोहन मांढवे (सर्व रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांना अटक करण्यात आली. स्वामी याने याबाबत मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणाचा भोसकून खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी वाहन चालक म्हणून काम करतो. आरोपींशी स्वामी याचा कोणताही वाद झाला नव्हता. १५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी विनाकारण वाद घालून त्याला शिवीगाळ केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. (Pune Crime News) आरोपी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराने स्वामी याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी नागरिकांना धमकावून परिसरात दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तपास करत आहेत.

सहकारनगर भागात तरुणाला मारहाण

Pune Crime News सहकारनगर भागातील ट्रेझर पार्क परिसरात किरकोळ कारणावरुन तरुणाला बेसबाॅल स्टीकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आर्यन जगदीश जवंजाळ (वय १९, रा. सिंहगड रस्ता) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा १६ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास ट्रेझर पार्क परिसरातील खाद्यपदार्थ विक्री दुकानात गेला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले होते. त्यापैकी एक आरोपी आर्यनचा ओळखीचा होता. रागाने का बघतो ? अशी विचारणा करुन आरोपींनी तक्रारदार तरुणाला बेसबाॅल स्टीकने मारहाण केली. आरोपी तेथून पसार झाले. पोलीस हवालदार कोळगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×