Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Theft News : शुक्रवार पेठेत फ्लॅटमधून लॅपटाॅप, मोबाइल चोरीला

Kasba Peth Crime News

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील शुक्रवार पेठेत सोसायटीतील फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी मोबाइल आणि लॅपटाॅप असा १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण हा शिक्षणासाठी पुण्यात आला आहे. तरुण आणि त्याच्या मित्रांनी अकरा मारुती चौकातील पद्ममिनी सोसायटीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे.

मेफेड्रोन विक्री प्रकरणी दोघे गजाआड – सविस्तर बातमी

चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून लॅपटाॅप, मोबाइल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार हेमंत पेरणे तपास करत आहेत. अशाच प्रकारची घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली आहे. चोरट्यांनी येवलेवाडीतील सोसायटीत असलेल्या सदनिकेतून तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्रांचा लॅपटाॅप आणि मोबाइल असा एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करत आहेत.

सोसायटीतील मोबाइल मनोऱ्याच्या बॅटरी चोरल्या

धनकवडीतील आंबेगाव पठार भागात असलेल्या
सोसायटीच्या छतावर असलेल्या खासगी दूरसंचार कंपनीच्या मोबाइल मनोऱ्याच्या १ लाख २५ हजार रुपयांच्या पाच बॅटऱ्या चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार हे आंबेगाव पठार भागातील मयूरेश पार्क सोसायटीच्या छतावर खासगी दूरसंचार कंपनीचा मनोरा आहे. मनोऱ्यातील यंत्रणेत पाच बॅटरी बसविण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी बॅटरी चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार चौधरी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×