‘बॉयकॉट तुर्की’ मोहिमेनंतर व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
marathinews24.com
पुणे – तर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घालून ‘बॉयकॉट तर्की’ ही मोहिम चालविणाऱ्या पुण्यातील सफरचंदाच्या होलसेल व्यापाऱ्याला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला आहे. त्याने याप्रकरणी सह पोलिस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. भारत – पाक युध्दात तर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. यामुळे तर्कीबरोबरील व्यापार सरकारने थांबविण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून तर्कीतून येणाऱ्या सफरचंदाची आयातही थांबविण्यात आली.
पुण्यात ड्रोन उडवण्याला ३० दिवसांची बंदी; ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा वाढवली – सविस्तर बातमी
पुण्यातील सफरचंदाचे होलसेल विक्रेते सूयोग झेंडे यांनीही तर्की सफरचंद विक्री न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इतर व्यापाऱ्यांना तसेच समाज माध्यमातून ही बाब समोर मांडली. दरम्यान आज सकाळी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरु पाच ते सहा वेळा व्हॉटस अप कॉल आहे. त्यांनी व्हॉटस अप चेक केले असता काही व्हाईस नोटस पाठविण्यात आल्याचे समजले. त्यांनी त्या ओपन केल्या असता गल्लीच्छ भाषेत धमकी देण्यात आली होती.
पाकिस्तान मधून आलेल्या धमकीला न घाबरता झेंडे यांनीही शांत न राहता प्रत्युत्तर देत एक व्हॉइस मेसेज रेकॉर्ड केला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, माझ्या पाठीमागे १४० कोटी भारतीय जनता आहे. मी कुणाला घाबरत नाही.