Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यातील दत्तवाडीत टोळक्याचा राडा, तरूणावर खूनी हल्ला

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

टोळक्याविरूद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरूणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १४ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडीतील म्हसोबा चौकात घडली आहे. याप्रकरणी टोळक्याविरूद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोल्ड ट्रेडींगच्या नादात गमावले ४० लाख रूपये – सविस्तर बातमी 

प्रतिकसिंह राजेश साळवे (वय २२, रा. दत्तवाडी) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विराज विजय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. सॅम उर्फ वार्‍या (रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याच्यासह ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकसिंह साळवे आणि यश कांबळे हे १४ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडीतील म्हसोबा चौकात थांबले होते. त्यावेळी जुन्या रागातून सॅम उर्फ वार्‍यासह टोळक्याने त्याला गाठले. टोळक्याने प्रतिकसिंहवर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. दगड विटांनी मारहाण करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शांत असलेला दत्तवाडी परिसर पुन्हा एकदा दोन गटातील भांडणामुळे चर्चेत आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×