Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

एसबीआय बँक मॅनेजर बोलतोय… सायबर चोरट्याने केली जेष्ठ महिलेची फसवणूक

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

तब्बल साडे चार लाख रुपये ऑनलाइनरित्या वर्ग करून घेतले

marathinews24.com

पुणे – एसबीआय बँकेतून मॅनेजर बोलतोय, डेबीट कार्ड सुरू करण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेला तब्बल ४ लाख ४७ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. त्याने महिलेला मोबाइल लिंक पाठवून देत, बँकखात्याची सर्व माहिती घेतली. त्यानंतर इंटरनेट बँकींगचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. ही घटना ३ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास औंध रस्त्यावरील सोना अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मी कृष्णमुर्ती अय्यर वय ६७, रा. औंध रोड यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील दत्तवाडीत टोळक्याचा राडा, तरूणावर खूनी हल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लक्ष्मी या कुटूंबियासह चतुःशृंगी परिसरातील औंध रस्त्यावरील सोना अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. ३ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. मी एसबीआय बँकेतून मॅनेजर बोलतोय, तुमचे डेबीट कार्ड सुरू करायचे आहे, त्यासंदर्भात माहिती द्या असे सांगितले. त्यानुसार लक्ष्मी यांनी त्याच्या म्हणण्यानुसार बँक खात्याची सर्व माहिती शेअर केली. सायबर चोरट्याने पाठविलेल्या लिंकद्वारे त्याने जेष्ठ महिलेच्या इंटरनेट बँकीगची माहिती घेतली. त्यानंतर त्याने ऑनलाईनरित्या ४ लाख ४७ हजार रूपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. बँकेतून पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर लक्ष्मीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक ननवर तपास करीत आहेत.

सावधान.. बँक खात्याची माहिती शेअर करू नका

नागरिकांनो तुम्हाला जर सायबर फसवणूक टाळायची असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अमूक-तमुक बँकेतून बोलतोय, अशी बतावणी करीत तुमच्या बँकखात्याची गोपनीय माहिती घेण्याचा प्रयत्न सायबर चोरटे करू शकतात. त्यांच्या फोनकॉल्सला उत्तर देणे टाळा. कोणत्याही बँकेतून तुमच्या खात्याचा पासवर्ड विचारला जात नाही. त्यामुळे कोणालाही बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नका, अन्यथा तुमची फसवणूक होउ शकते, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×