Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

MIDC Plot Lottery Baramati : इंदापूर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; बारामतीत पारदर्शक भूखंड सोडत- हनुमंत पाटील

४१ पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी १०० चौ.मी. भूखंडाचे वाटप; सोडत प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर

marathinews24.com

बारामती – इंदापूर औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पबाधित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महत्त्वाचे पाऊल उचलले असून पात्र ४१ प्रकल्पग्रस्त अर्जदारांना प्रत्येकी १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड वाटप करण्यासाठी पारदर्शक सोडत प्रक्रिया बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) बारामती प्रादेशिक कार्यालयात घेण्यात आली.

आगीने हिरावला संसार; चिमुकल्यांचे दप्तर, पुस्तकेही जळून खाक – सविस्तर बातमी

उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेष भूखंड वाटप समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रकल्पग्रस्तांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रियेत १०० टक्के पारदर्शकता रहावी, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले.

बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींची ओळखपत्रे व कागदपत्रे तपासून स्वाक्षरीसह उपस्थिती नोंदविण्यात आली. त्यानंतर उपस्थितांच्या संमतीने पीपी ४१ ते पीपी ८९ या उपलब्ध भूखंड क्रमांकांच्या चिठ्ठ्या तयार करून त्या सर्वांसमक्ष पारदर्शक बरणीत टाकण्यात आल्या.

कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी इयत्ता तिसरीतील एका लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यादीनुसार क्रमांकाने अर्जदारांना भूखंडांचे वाटप जाहीर करण्यात आले. या अभिनव पद्धतीमुळे सोडत प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्याचे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या सोडत प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र व्यवस्थापक महेश बळाळ, उपरचनाकार प्रांजली मंडलिक, सहायक क्षेत्र व्यवस्थापक सागर पाटील आणि प्रमुख भूमापक बाळाजी निलेदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रक्रियेमुळे इंदापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×