Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या विटंबनेचा बारामतीत शिवसेनेकडून निषेध

भिगवण चौकात शिवसेना (उबाठा) पक्षाचे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची पोलीस प्रशासनाकडे मागणी

marathinews24.com

बारामती – Baramati Shivasena Protest : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची विटंबना केल्याच्या घटनेचा बारामतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, (दि.१९) रोजी बारामतीतील भिगवण चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. स्व.बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान आणि लाखो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या छायाचित्राची विटंबना होणे ही अत्यंत निंदनीय बाब असून, यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन – सविस्तर बातमी

या प्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. या आंदोलनात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख हनुमंत भापकर,गणेश करंजे युवासेन बारामती,निखिल देवकाते युवासेना तालुका प्रमुख बारामती,ॲड.ऋषीकेश शिंदे युवासेना उपतालुकाप्रमुख बारामती,शौकत बागवान, उमेश दुबे,सर्वेश वाघ, महिला आघाडीच्या सुमिता खोमणे, राजकुमार शहा आदी उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष विरधवल गाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. आकाश मोरे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सौरभ रुपनवर यांनीही उपस्थिती लावली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×