Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Hinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांचा सविस्तर आढावा

marathinews24.com

पुणे – हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढत्या नागरिकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाची कामे गतीने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

रस्ते विकासासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नोव्हेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक बाबी अंतिम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रस्त्यांच्या कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करून २० डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे अलाइनमेंट, भूसंपादन, टीडीआर आणि डीपीआरसंदर्भातील अडचणी तातडीने दूर कराव्यात. रिंगरोडच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडचणी सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनावर भर

परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रियेच्या प्रश्नांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे, सांडपाण्याचा ओव्हरफ्लो रोखणे आणि पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर करावेत. मुळशी धरण आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करा

परिसरात उघड्यावर कचरा जाळणे तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाले व नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून दोषींना नोटिसा बजावाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आवश्यकतेनुसार कारवाई करावी. कचरा टाकण्याची ठिकाणे आणि प्रदूषणाची संभाव्य ठिकाणे निश्चित करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समन्वय

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात. पुढील बैठकीपूर्वी सर्व विभागांनी प्रलंबित अहवाल, निविदांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष सुरू केलेल्या कामांचा तपशील सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

यावेळी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील नागरिकांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×