Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त

Pune Pistol Seizure News

गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Pistol Seizure News : बेकायदा पिस्तूल बाळगून फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे असा ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १८) चांद्रभागा चौकाजवळ केली.

अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी हे पथकासह १८ नोव्हेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना चंद्रभागा चौकाजवळ एकजण पिस्तूलासह थांबल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सराईत अर्थव मारणे याला ताब्यात घेतले. (Pune Pistol Seizure News) त्याच्याकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त केली. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, एपीआय स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक तेजश्री पवार, शंकर नेवसे, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, ओमकार कुंभार, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव, साधना ताम्हाणे यांनी केली.

आरोपीवर खून, आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल

आरोपी अथर्व मारणे सराईत असून, त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यातंर्गत खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच पिंपरी-िंचचवडमधील सांगवी, चिखली पोलीस ठाण्यातंर्गत आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यामुळे गंभीर गुन्हा टळला असून, गुन्हे शाखेचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×