Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसद

Maharashtra Child Parliament 2026

३४ जिल्ह्यांतील बालस्नेही ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी होणार सहभागी; ग्रामसभा ते विधानमंडळाच्या कामकाजाचा अनुभव घेणार बालप्रतिनिधी

marathinews24.com

पुणे – Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेत बालकांचा सहभाग, त्यांचे हक्क, अपेक्षा आणि भविष्याविषयीचे विचार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी), पुणे येथे राज्यस्तरीय बाल संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील प्रत्येकी तीन बालस्नेही ग्रामपंचायतींमधील १०२ बालप्रतिनिधी या संसदेत सहभागी होणार आहेत.

झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – सविस्तर बातमी  

ग्रामविकास विभाग, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत यशदाच्या लेझीम हॉलमध्ये हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालप्रतिनिधींना लोकशाही प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. Maharashtra Child Parliament 2026 या ग्रामपंचायतींमधील बालपंचायतींचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी तीन बालप्रतिनिधी अशा एकूण १०२ बालप्रतिनिधींची बाल संसदेसाठी निवड करण्यात आली आहे. या प्रतिनिधींसोबत संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच अथवा ग्रामपंचायत अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

या बाल संसदेत सकाळी १० वाजता ग्रामपंचायत स्तरावरील बालसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजल्यापासून बाल संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. ग्रामपंचायतींचे कामकाज, बालसभेची रचना व कार्यपद्धती तसेच विधानमंडळातील कामकाजाची प्रक्रिया याविषयी बालप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष संसदीय कामकाजाच्या धर्तीवर चर्चा, विचारमंथन आणि विषयांची मांडणी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

बालकांच्या सहभागातून विकासाचा विचार

बालस्नेही ग्रामपंचायत संकल्पनेचा मुख्य उद्देश बालकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, गावाच्या विकासाशी संबंधित निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे आणि त्यांच्या समस्या, गरजा व अपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचविणे हा आहे. बाल संसदेमुळे ग्रामीण भागातील बालप्रतिनिधींना आपल्या गावाच्या विकासाबाबत विचार मांडण्याची आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

विकसित महाराष्ट्राचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून होणाऱ्या या बाल संसदेत बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, पोषण, स्वच्छता तसेच गावाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे. बालकांचा आवाज विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरावा, त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची संधी मिळावी आणि लोकशाही मूल्यांची रुजवण लहान वयातच व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×