उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची मध्य प्रदेशातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
marathinews24.com
बारामती – Baramati Sports News : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,पुणे आणि पुणे सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा (१९ वर्ष मुले व मुली)जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या.
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या तयारीला वेग द्या – सविस्तर बातमी
स्पर्धेचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते टॉस करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर हे होते. या प्रसंगी श्री.सातव यांनी बारामती येथील अत्याधुनिक क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी सराव व विविध स्तरांवरील स्पर्धांसाठी लाभ घ्यावा आणि खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ,नाशिक, नागपूर,लातूर, अमरावती,छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर या ८ विभागांमधून १०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले.या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची देवास (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. Baramati Sports News
स्पर्धा विजेते अनुक्रमे – वैयक्तिक विजेते ( राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडू )
१९ मुली- प्रथम- भक्ती संदीप क्षीरसागर (बुलढाणा), व्दितीय- पूर्वा सुनील सराटे (सांगली) ,तृतीय- सोनाल गणेश खर्चे (बुलढाणा) चतुर्थ- श्रावणी गजानन जोगदंड (बुलढाणा), पाचवा- दिव्या मनोज मोकळ (रायगड).
१९ मुले – प्रथम- सुयश संजय आडे (धाराशिव), व्दितीय- अनुराग पुरुषोत्तम पाटील (सातारा), तृतीय – अनुराग पुरुषोत्तम पाटील (पुणे), चतुर्थ- सनेश किशोर पाटील (जळगाव), पाचवा- हर्षवर्धन विठ्ठल पाटील (नांदेड) .
सांघीक स्पर्धा विजेते विभाग- प्रथम -लातूर ,व्दितीय – छ.संभाजीनगर,तृतीय – अमरावती
मुली – प्रथम – अमरावती ,व्दितीय- मुंबई ,तृतीय – छ.संभाजीनगर.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रस्तावित केले. तर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, यांनी आभार मानले.
संतोष लवटे, तालुका क्रीडा अधिकारी, विल्सन ॲड्रीज सचिव सॉफट टेनिस असोसिएशन, प्रशांत रणदिवे,दादासो आव्हाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुहास हाडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिमन्यु इंगोले, तसेच तांत्रिक पंच मंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.























