Breking News
Amitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्तMarathi Book Publication Pune : स्थितप्रज्ञ राहून समाजप्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती- प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे

Pune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Pune RMC Pollution Control

आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा

marathinews24.com

पुणे – Pune RMC Pollution Control : पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण या दोन्ही बाबींशी कोणतीही तडजोड होता कामा नये. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबी हातात हात घालून पुढे जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – सविस्तर बातमी 

शासकीय विश्रामगृह येथे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक विषयांचाही आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

Pune RMC Pollution Control उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून, या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला बाधा पोहोचेल, अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेले नियम व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग, यंत्रणा आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बैठका घेऊन आढावा घ्यावा. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पर्यावरणविषयक प्रश्नांची सोडवणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर द्यावा. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकास या बाबींचा विचार करून सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करावे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) संदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×