Breking News
Mission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्त

SOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजन

SOMI Maharashtra Chapter

माता व नवजात बालकांचे आरोग्य, सुरक्षित प्रसूती आणि मिडवाइफरी सेवेबाबत जनजागृती

marathinews24.com

बारामती – SOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासह गर्भवती महिलांमध्ये सामान्य व नैसर्गिक प्रसूतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया (Society of Midwives India – SOMI), महाराष्ट्र चॅप्टर यांच्या वतीने रविवारी (२२ नोव्हेंबर) बारामती येथे ‘Nationwide Walk for Natural Birthing’ या देशव्यापी अभियानांतर्गत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

बारामतीत राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा संपन्न – सविस्तर बातमी 

नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व अधोरेखित करणे, माता व नवजात बालकांच्या आरोग्याचे संवर्धन करणे आणि प्रसूतीदरम्यान मिडवाइफरी सेवेची भूमिका जनमानसात रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. वाढत्या सिझेरियन प्रसूतींच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असलेल्या परिस्थितीत योग्य हस्तक्षेप करण्याबरोबरच सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूतीला प्रोत्साहन देण्याची गरज या पदयात्रेतून व्यक्त करण्यात आली.

प्रसूतीदरम्यान महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि संवेदनशील आरोग्यसेवा मिळावी, तसेच प्रशिक्षित मिडवाइफच्या माध्यमातून महिलांना सक्षम करावे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. या पदयात्रेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामतीच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, रुग्णालयाच्या अधिसेविका सीमा माने, शासकीय परिचर्या महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राचार्या, SOMI महाराष्ट्र चॅप्टरच्या सचिव डॉ. संगीता भुजबळ, शारदाबाई पवार नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वीणा जाधव, गिरीराज कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य अभिजित वानखडे, भारवी मुलमुले सहभागी झाले.

SOMI Maharashtra Chapter यावेळी अधिष्ठाता डॉ. पाटील यांनी सामान्य व नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व विशद केले. नैसर्गिक प्रसूतीला योग्य प्राधान्य दिल्यास माता आणि बाळाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत होते. गर्भवती महिलांमध्ये नैसर्गिक प्रसूतीबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही जनजागृती पदयात्रा बारामती शहर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन नटराज कला मंदिर आणि तिरंगा चौक येथे उत्साहात संपन्न झाली. पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी, विद्यानगरी मेडिकलचे सचिन मोकाशी, सौरभ काटे आणि त्यांच्या समूहातील सदस्यांचे सहकार्य लाभले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×