Breking News
Mission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्त

Gift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Gift of Education Pune

महेश फोरम चॅरिटेबल ट्रस्ट आणि महेश प्रोफेशनल फोरम ; ‘भजन जॅमिंग’ कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – Gift of Education Pune : आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये… शिक्षणासाठी त्यांना आर्थिक साथ देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ हा अनोखा उपक्रम पुण्यात राबविला जात आहे. याअंतर्गत महाराष्ट्राच्या विविध भागातील १०० विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च करण्यात येत असून आजपर्यंत राज्यातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजन – सविस्तर बातमी 

महेश फोरम चॅरिटेबल ट्रस्ट आणि महेश प्रोफेशनल फोरम यांच्या ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ उपक्रमांतर्गत झोन २ मधील एमपीएफ कोथरूड, एमपीएफ सेंट्रल, एमपीएफ कात्रज आणि एमपीएफ गोल्डन एरा या चार शाखांनी संयुक्तपणे बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे हा निधी संकलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख देणगीदार म्हणून मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तमजी लोहिया यांचे सहकार्य लाभले.

Gift of Education Pune उपक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अशोकजी लड्डा, पुरुषोत्तम मुंदडा, सीए दिनेश मुंदडा आणि सीएस प्रमोद लड्डा यांचे सहकार्य लाभले. आयोजनात एमपीएफ कोथरूडचे अध्यक्ष स्वप्निल काबरा व संचालक सीए अजय नवाल, एमपीएफ सेंट्रलचे अध्यक्ष अमित राठी व संचालिका सरिता चांडक, एमपीएफ कात्रजचे अध्यक्ष अमित सोमाणी व संचालक निखिल भट्टड, तसेच एमपीएफ गोल्डन एराच्या अध्यक्षा मीनाक्षी सारडा व संचालक श्यामसुंदर भंडारी यांच्यासह चारही शाखांच्या सदस्यांनी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. इतर देणगीदार, प्रायोजक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणाऱ्या कंपन्यांनीही उपक्रमाला पाठबळ दिले.

शैक्षणिक उपक्रमाच्या सहाय्यतेसाठी आयोजिलेल्या ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन – भजन जॅमिंग’ कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला सुमारे दोन हजार जण उपस्थित होते. ‘रहस्य – द म्युझिकल प्रोजेक्ट’च्या भजनांवर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ठेका धरला. गंगा आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरुषोत्तमजी लोहिया यांनी सांगितले की, केवळ पैशांची कमतरता आहे म्हणून कोणत्याही गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. एमएफसीटी आणि एमपीएफला अशा विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवता यावी, यासाठी मुकुंद भवन ट्रस्टने ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ला पाठबळ दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. एमपीएफ कोथरूडचे अध्यक्ष स्वप्निल काबरा म्हणाले, ट्रस्ट गेली १५ वर्षे समाजोपयोगी काम करत आहे. विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि उद्योजकांसह दोन हजारांहून अधिक कुटुंबे एमपीएफच्या माध्यमातून या कामाशी जोडली गेली आहेत.

एमपीएफ सेंट्रलच्या ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ संचालिका सरिता चांडक म्हणाल्या की, एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण दिल्यास त्या दिवसाची भूक भागते; पण एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळते. गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, हाच या निधी संकलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व देणगीदार आणि सहकाऱ्यांचे आभार मानून त्यांनी पुढेही या उपक्रमाला साथ देण्याचे आवाहन केले. सीए अजय नवाल यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×