अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त देण्याचे लेखी आदेश
marathinews24.com
पुणे – Amitesh Kumar Pune : शहरातील विविध भागात महानगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याचा बडगा उगारला आहे. त्यावेळी पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे कारवाईवेळी आडकाठी निर्माण होत असल्याचा आरोप महापालिका प्रशासनाने केला होता. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापुर्वीच प्रत्येक पोलीस ठाणे प्रमुखांना अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी बंदोबस्त देण्याचे लेखी आदेश दिल्याचे सांगितले. तुम्ही आम्हाला ५० मागितले तर आम्ही १०० अमंलदार बंदोबस्तासाठी उपलब्ध करुन देउ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार – सविस्तर बातमी
नागरिकांच्या सेवेसाठी पोलिसांकडून वेळोवेळी प्राधान्य दिले आहे. दरम्यान, शहरातील विविध भाग अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईवेळी महापालिका प्रशासनाला यापुर्वी पुणे पोलिसांनी बंदोबस्त दिलेला आहे. तसेच प्रत्येक ठाणे प्रमुखांनी हद्दीतील अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी बंदोबस्त पुरविण्याचे लेखी आदेश दिले असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. नागरिकांंचा मनस्ताप कमी करण्यासाठी आम्ही आमच्या प्रत्येक पातळीवर प्राधान्य देतो. अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी संबंधित हद्दीतील महापालिका प्रशासनाने मागणी केल्यास तत्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला जात आहे. ५० मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास त्याऐवजी जादा मनुष्यबळही उपलब्ध करुन देणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांचा अनोखा सन्मान
Amitesh Kumar Pune विमाननगर परिसरात मुजोर बांधकाम व्यावसायिकाने दमदाटी करुन जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना २१ नोव्हेंबरला घडली होती. खासगी बाउंसरच्या मदतीने त्याने परिसरातील झोपडी तोडण्यासाठी यंत्रसामु्रगी वापरली होती. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट वरिष्ठ अधिकार्यांना धारेवर धरले. मुजोर बिल्डरला खडे बोल सुनावून कारवाई थांबवली होती. त्यामुळे झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना दिलासा मिळाला. त्यापार्श्वभूमीवर भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या उपस्थितीत संबंधित झोपडपट्टीवासियांनी पोलीस आयुक्तालयात अमितेश कुमार यांचा सत्कार केला.
























