Breking News
Mission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्त

Mission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावा

Mission Lakshvedh Maharashtra

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘मिशन लक्षवेध’ची केंद्रे तातडीने कार्यान्वित करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार; बालेवाडी क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाच्या योजनांचाही लाभ घ्या

marathinews24.com

पुणे – Mission Lakshvedh Maharashtra : राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडूंनी यश संपादन करावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘मिशन लक्षवेध’ हा राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात येणारी सर्व केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावीत. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत या योजनेच्या माध्यमातून भारताला निश्चितपणे पदक मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

शासकीय अतिथिगृहात आयोजित ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त दीपक सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन लक्षवेध’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेते बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Mission Lakshvedh Maharashtra

बालेवाडी क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मागील अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती. यावर्षीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना गती देतानाच सर्व पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. केंद्र शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घेऊन क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी क्रिडा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×