Breking News
pune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषण

14 Women Sexual Exploitation Case

आरोपीला दुबईतून अटक करून हिंदुस्थानात आणले

marathinews24.com

पुणे – 14 Women Sexual Exploitation Case : लग्नाच्या आमिषाने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर फरार आरोपीला दुबईतून हिंदुस्थानात आणले आहे. त्याने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. महिलांच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. मोहम्मद माजिन मोहम्मद अब्दुल रशीद असे आरोपीचे नाव आहे. त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) इंटरपोल शाखेने दुबईतून ताब्यात घेतले. सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून आंतरराष्ट्रीय कारवाई केली.

प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्त – सविस्तर बातमी 

छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पीडित महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करून तब्बल १८ लाख रुपये घेतले. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. तपासादरम्यान आरोपीने अशाच पद्धतीने आणखी १३ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केल्याचे उघडकीस आले. महिलांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्या खासगी क्षणाचे व्हिडिओही रेकॉर्ड केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पळून गेला होता.

आरोपी दुबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीच्या इंटरपोल शाखेने छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या विनंतीनुसार सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोल फ्रान्सकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आरोपीविरुद्ध रेड नोटीस जारी केली. नोटिशीच्या आधारे संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अधिकार्‍यांनी शोधून त्याला अटक केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूएईने त्याला हिंदुस्थानकडे देण्याची मंजुरी दिली. (14 Women Sexual Exploitation Case) छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक १८ नोव्हेंबरला आरोपीचा ताबा घेण्यासाठी दुबईला गेले. २० नोव्हेंबरला हे पथक आरोपीसह कोचीमार्गे नवी मुंबईत दाखल झाले. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडली. सीआयडीच्या इंटरपोल शाखेने २०२६ मध्ये परदेशात फरार झालेल्या ६ आरोपींना परत आणले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×