शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४८ वर्षीय महिलेची तक्रार
marathinews24.com
पुणे – pune molestation case : सोसायटीतील महिला रहिवाशाचा विनयभंग तसेच तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोपावरून माजी पोलीस अधिकारी अभय परमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय मुकुंदराव परमार (वय ६२, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंद केलेल्याचे नाव आहे. याबाबत ४८ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना रविवारी दि.२२ मॉडेल कॉलनी परिसरात घडली असून, याप्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषण – सविस्तर बातमी
pune molestation case पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि माजी पोलीस अधिकारी अभय परमार हे मॉडेल कॉलनीतील इमारतीत राहण्यास आहेत. रविवारी तक्रारदाराच्या पतीने गाडी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून धुण्यासाठी नेली होती. गाडी इमारतीच्या पाठीमागून नेली होती. त्याचवेळी अभय परमार हे तेथे आले, त्यांनी तक्रारदारांच्या पतीला गाडीच्या खाली बोलवून आर्वच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यांना मारहाण सुरू असतानाच तक्रारदार व त्यांची मुलगी घटनास्थळी आल्या.
अभय परमार यांनी तक्रारदार यांनाही शिवीगाळ करून त्यांना बघून घेऊ अशी धमकी दिली. त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने वर्तन केले. जुन्या वादातून ही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यापूर्वी त्यांनी तक्रारदार यांच्या कुटुंबाला विनाकारण शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.























