रास्ता रोको आंदोलन; दीड तास वाहतूक ठप्प
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – Beed Massajog News : थोर संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची पायी दिंडी पदयात्रा ही गेल्या ७२ वर्षापासून चापोली ते कपिलधार अखंडपणे काढली जाते. दिंडीचे आगमन सोमवारी केज – मांजरसुंबा मार्गावरील मस्साजोगमध्ये झाले होते. त्यावेळी दिंडीतील महिला भक्ताला अज्ञात वाहनांचा धक्का लागल्याने महिला किरकोळ जखमी झाली. त्यामुळे पदयात्रेतील भाविकांकडून रास्ता बंद करून एक ते दीड तास वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
पोलिसांनी मध्यस्थी करून भाविकांशी चर्चा केली. वाहन चालकावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर महामार्ग खुला करून दिला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना यश मिळाले. संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या जयघोषात प्रवचन सोहळा मस्साजोगमध्ये पार पडला. कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या दर्शनासाठी कार्तिकी पौर्णिमेला येणाऱ्या दिंड्यापैकी थोर संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची ही दिंडी सर्वात मोठी असते. दिंडीत हजारो शिवभक्त, वाहनांचा ताफा असतो. दिंडी प्रामुख्याने चापोली, चाकुर, वडवळ, जानवळ, पानगाव, घाटनांदुर, पूस, अंबाजोगाई, होळ, चंदनसावरगाव, केज, मस्साजोग,नेकनुर, मांजरसुबा मार्गे कपिल धारला जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वीरशैव बांधव आणि ग्रामस्थ दिंडीतील शिवभक्तासाठी चहा, फराळ व जेवनाची व्यवस्था दरवर्षी करतात.
रविवारी रात्री ही दिंडी केज शहरात मुक्कामी होती. सोमवारी सकाळी मस्साजोग मध्ये चहा, नाश्ता करून दिंडी कपिलधार कडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडीमध्ये उपस्थित युवा संत राज शेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, सोमलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ काशी, माता उमरी संगम बस महाराज निलंगेकर उपस्थित होते. या दिंडीमध्ये हजारो महिला व पुरुष भक्त सहभागी झाले होते.
Beed Massajog News भक्त स्थळ ते कपिलधार दिंडीचे मस्साजोगमध्ये आगमन होताच केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गवर वाहनाचा धक्का दिंडीतील वारकरी महिलेला लागल्यामुळे दिंडीतील भाविकांनी थेट रस्त्यावर बसून रस्ता रोको केला. एक ते दीड तास वाहतूक ठप्प करून वाहनांच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहन चालकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला आणि भाविकांनी रस्त्यावर बसून असलेल्या भाविकांना आणि महाराजांशी संबंधित घटनाक्रम सांगून अज्ञात वाहनाच्या चालकावर कारवाई करण्यात यावी अशी भाविकांनी मागणी केली. त्यानंतर पोलीस अधिकारी महेश शिरसागर आणि त्यांच्या पोलीस सहकार्याने भाविकांची समजूत काढून संबंधित अज्ञात वाहन चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर भाविकांनी रस्त्या मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.
वाहनांचा भाविक महिलेला धक्का लागल्यावर दिंडीतील भाविकांनी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली असता पोलिसांनी तुमचा माणसाचा जीव गेला का ? असे उलट.सुलट सवाल केले. तक्रार घेण्यास नकार दिला व अज्ञात वाहन चालकाची बाजू घेत भाविकांना अरेरावी केली. त्यामुळे भाविकांनी राष्ट्रीय महामार्गवर एक ते दीड तास चक्का जाम करून पोलिसांचा निषेध केला. एस पी साहेब तुमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना असेच अरेरावी करण्याचे प्रशिक्षण दिले आहे का? जर त्या महिलेचे काही बरे वाईट झाले असते तर पोलीस प्रशासन जबाबदार राहिले असते का? संबंधित अरेरावी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कपिलधार यात्रेतील पदाधिकारी जीवन पाटील यांनी केली आहे.
























