याप्रकरणी हडपसर आणि खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मगरपट्टासह खराडी परिसरात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल २७ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर आणि खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेडरूममधील खिडकीतून आतप्रवेश करीत चोरट्यांनी २३ लाख ४३ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १७ ते १८ मे कालावधीत हडपसरमधील मगरपट्टा परिसरातील नार्थ एच फ्लॅटमध्ये घडली आहे.
परिक्षेसाठी बसविला डमी विद्यार्थी, दोघाविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पार्थ मलकन गौंडा (वय ४४ रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार पार्थ हे १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून घरात येउन सोन्याचे दागिने, रोकड असा २३ लाख ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.
तर दुसर्या घटनेत खराडीतील इमारतीच्या स्टोअर रूममधून चोरट्यांनी नवीन वायरचे ६० बंडल चोरून नेले आहेत. याप्रकरणी विनय प्रकाश गाडगीळ (वय ४२, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १३ ते १४ मे कालावधीत झेन वन बिल्डिंग, मार्वल इनिग्मा सोसायटी शेजारील इमारतीच्या स्टोअर रूममध्ये घडली आहे. पोलिस उपनिरीक्षक कोळपे करत आहेत.