Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

नाशिकमध्ये ‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्कारांचे आयोजन

जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये ‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्कारांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बसवंत हनी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा ‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्कार वितरण सोहळा उद्या, २० मे रोजी सकाळी ११ वाजता बसवंत हनी पार्क, पिंपळगाव, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाकरीता ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

यावर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सचिन उगले आणि राजू मंडल (कोसबाड, डहाणू, पालघर) यांची ‘मधु मित्र’ पुरस्कारासाठी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तेजा घोरपडे यांची ‘मधु सखी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

राज्यातील मधमाशी पालन करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०२३ पासून या पुरस्कार योजनेची सुरुवात केली आहे. हे पुरस्कारांचे तिसरे वर्ष असून या सोहळ्यात मधपालकांना उत्तेजनार्थ विशेष पुरस्कारांचेही वितरण केले जाईल. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास अधिकाधिक मधपाल आणि या विषयात आवड असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×