Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात दोघा सराईतांची कारागृहात रवानगी

पोलीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा; सहकारनगर परिसरात माजविली होती

marathinews24.com

पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून परिसरात दादागिरी करणार्‍या दोघा सराईतांची सहकारनगर पोलिसांनी कारागृहात रवानगी केली आहे. त्यांच्याविरूद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल आहेत.वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याच्या वागणुकीत फरक पडलेला नव्हता. त्यामुळे दोघांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

हवाई दलाच्या जवानाच्या वेशात करत होता वावर – सविस्तर बातमी

जयेश ऊर्फ जयडया दत्ता ढावरे (वय २१ रा. गल्ली नं.७ तळजाई वसाहत पद्मावती पुणे) आणि तुषार ऊर्फ डेंब्या टायगर आरणे (वय १९, रा. गल्ली नं ११, तळजाई माता वसाहत, पद्मावती, पुणे ) अशी स्थानबद्ध केलेल्या सराईतांची नावे आहेत.

गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांनी कडक पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. सहकारनगर परिसरातील सराईत जयेश ऊर्फ जयडया दत्ता ढावरे हा २०२३ पासुन गुन्हेगारीमध्ये सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हत्यारे जवळ बाळगुन मनाई आदेशाचा भंग करुन, दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, जबर दुखापतीसह जबरी चोरी किंवा दरोडा, दंगा करणे, विनयभंग करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तोडफोड करण्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर तुषार ऊर्फ डेंब्या टायगर आरणे हा सुद्धा २०२३ पासुन सक्रिय आहे. त्याच्याविरुध्द गंभीरस्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

अल्पवयीन असताना खुन, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्यासह दरोडा टाकणे, सार्वजनीक मालमत्तेचे तोडफोड करणे, गृहअतिक्रमण, जबर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सराईत जयेश ढावरे वागणुकीत फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रुर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गौड यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला. त्यानुसार त्याला १७ मे रोजी नागपूर कारागृह स्थानबद्ध केले.

तर सराईत तुषार ऊर्फ डेंब्या टायगर आरणे याला येरवडा कारागृहामध्ये स्थानबद्ध केले. सराईत गुन्हेगारांकडून कोणताही अनुचीत प्रकार घडु नये, यासाठी पोलीसांकडुन त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, (गुन्हे) यांच्या सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार विनायक एडके, पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर, गोरख ढगे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×