कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील थेउर फाटा परिसरात घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत अनोखळी पादचार्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात २१ मे रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील थेउर फाटा परिसरात घडला आहे. अपघातात ठार झालेल्या अनोखळीचे अंदाजे वय ५० असून, त्याची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार विजय जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.
जादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून पादचारी अनोळखीला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या ५० वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नसून, पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गालगत गावांमध्ये रस्ता ओलांडत असताना अनेक पादचार्यांचा जीव गेला आहे. अपघाताप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.