तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे केले आवाहन
marathinews24.com
बारामती- तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
“येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश – सविस्तर बातमी
बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तालुक्यात २३ मे अखेर सरासरी १४४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद बारामती मंडळात १७३ मि.मी. माळेगाव बु.९२-मि.मी., पणदरे ११२ मि.मी., वडगाव निंबाळकर १६५ मि.मी., लोणी भापकर १८४ मि.मी., मोरगाव १६८ मि.मी., सुपा १३० मि.मी., उंडवडी क.प.१२८ मि.मी. याप्रमाणे सरासरी मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
२४ मे रोजी सरासरी ८२.८७ मि.मी पर्जन्यमानाची नोंद
तालुक्यात २४ मे रोजी (शनिवारी) बारामती मंडळात १२७ मि.मी. माळेगाव बु.७५-मि.मी., पणदरे ९३ मि.मी., वडगाव निंबाळकर ९६ मि.मी., लोणी भापकर ९५ मि.मी., मोरगाव ६४ मि.मी., सुपा ४८ मि.मी., उंडवडी क.प.६५ मि.मी. याप्रमाणे सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.