येरवडा कारागृहात कार्यक्रम संपन्न
marathinews24.com
पुणे – कारागृहातील बंद्यांसाठी येरवडा मध्यवर्ती २४ मे रोजी विशेष मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “स्वर आकाश गाणी तुमची आमची यांच्यावतीने, टाटा ट्रस्टच्या ‘प्रयास’ आणि इंडिया व्हिजन फाऊंडेशन, दिल्ली यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ सुहास वारके कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात विविध देशभक्तीपर हिंदी व मराठी गाण्यांची रंगतदार मैफल सादर करण्यात आली. शिल्पा गोडबोले, स्वाती कुलकर्णी, केतगी वागळे, चेतन्य वागळे, सुनिल गाडे, अश्विन परमार व महेश लाहीगुडे या कलाकारांनी सादरीकरणातून बंद्यांना भावनिक व सांस्कृतिक उर्जा प्रदान केली. उपक्रमास बंद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या नियोजनात इंडिया व्हिजन फाऊंडेशनच्या हिना कुरेशी, तसेच टाटा ट्रस्टच्या प्रयास संस्थेच्या हिना सय्यद, संदीप दिघे यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल एन. ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, उपाधीक्षक आर. ई. गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनं