अज्ञात चोरट्यांविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ७० हजार रूपयांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना २३ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र चौकातील कल्याण ज्वेलर्स बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी दत्तवाडीत राहणार्या ६६ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहियानगरमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला दत्तवाडीत राहायला असून, २३ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र चौकातील कल्याण ज्वेलर्स बसस्थानकात थांबल्या होत्या. महिला बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या हातातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. बसप्रवासात बांगडी चोरली गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिरसाट तपास करीत आहेत.