हायड्रोक्लोरिक ऍसिड टँकर पलटी

हायड्रोक्लोरिक ऍसिड टँकर पलटी

सुदैवाने जीवितहानी नाही

marathinews24.com

पुणे – महाड येथील मे. बीटा केमिकल, MIDC येथून पुणे मार्केटिंग, भेकराई नगर, फुरसुंगी येथे जात असलेला हायड्रोक्लोरिक ऍसिडने भरलेला टँकर (MH 04 HD 4530 अंदाजे २८,००० लिटर) डोंगरवाडी, ताम्हिणी घाट परिसरात रविवारी पलटी झाला. धुक्यामुळे रस्ता नीट दिसत नसल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे टँकर खचलेल्या रस्त्यावरून दरीकडे घसरून पलटी झाला. टँकरचा चालक वाहनात अडकला होता, मात्र मागून येणाऱ्या बस चालकाच्या सतर्कतेमुळे त्याला सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

टँकरमधील हायड्रोक्लोरिक ऍसिड दरीत वाहून गेले असून, रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने काही प्रवाशांना डोळ्यांची जळजळ झाली. जवळपास सर्व टँकर रिकामा झाला असून, सध्या क्रेनच्या साहाय्याने टँकर रस्त्याच्या कडेला हलवण्यात आला आहे. मदतकार्यात पीएमआरडीए अग्निशमन दल, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम, LCS रिस्पॉन्स टीम, रायगड रेस्क्यू टीम, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top