Breking News
पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात

‘अभंगरंग’ अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

'अभंगरंग' अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

‘अभंगरंग’ मधून भक्तिरसाचा आविष्कार !

marathinews24.com

पुणे – भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन आणि संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभंगरंग’ या अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि. ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे करण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात भक्तिरसात न्हालेल्या अभंग गायनाने रसिकांची मने जिंकली आहेत त्यामुळे  ‘अभंगरंग’ अभंग गायन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुकुलच्या युवा गायिका अनुष्का साने, रसिका पैठणकर आणि नुपूर देसाई यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. गीत इनामदार (तबला), आकाश नाईक(हार्मोनियम), स्वप्नील सूर्यवंशी (पखवाज) आणि आनंद टाकळकर (तालवाद्य) यांनी गायिकांना साथसंगत केली , तर कार्यक्रमाचे भावपूर्ण निरूपण ह. भ. प. मानसी बडवे यांनी केले.

बिग बॉस फेम अभिनेत्रीचे “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित – सविस्तर बातमी 

‘जय जय राम,कृष्ण हरी’ या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अनुष्का साने यांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर,पाहावा नयनी’,’छंद लागला’ हे अभंग सादर केले.रसिका पैठणकर यांनी ‘एकच रे मागणे’,’श्रीरंगा’,’जोहार’ हे अभंग सादर केले. नुपूर देसाई यांनी ‘रूप पाहता लोचनी’,’अवघाचि संसार’,’परब्रम्हम निष्काम ‘हे अभंग सादर केले.’अगा वैकुंठच्या राया ‘ या अभंगाने सांगता झाली.सांस्कृतिक प्रसाराच्या उपक्रमांतर्गत भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणारा हा २५१ वा कार्यक्रम ठरला.कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रवेश विनामूल्य होता. पुणेकर रसिक,भाविकांनी या भक्तिपर्वाचा लाभ घेतला.

भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन कलाकारांचा सत्कार केला.संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान चे गोविंद बेडेकर,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी प्रमुख अभियंता अविनाश शेटजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top