Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर sp नवीन आणले. मात्र खालची यंत्रणा जुनीच -आ.रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी घेतली देशमुख कुटुंबींयाची भेट

marathinews24.com

बीड – अनंत जाधव – मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरला होता, मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे.तरीही याप्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी पोलिसांना सापडत नाही यात बीड पोलीसांचे दुर्दैव असल्याचा संताप मस्साजोग करांनी आमदार रोहित पवार यांच्या समोर व्यक्त केला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवार यांनी मस्साजोग येथे जात दिनांक २९ जूलै रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि गावातील नागरिकांची भेट घेतली. यावेळी आमदार रोहित पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले वाल्मीक कराड याला बीड पोलिस vip ट्रिटमेंट देतात त्यामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे,सर्व आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवले पाहिजेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पुढे बोलताना म्हणाले वाल्मीक ची गँग अजूनही बाहेर आहे.तीच्यावर कसल्याचं प्रकारचे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही.पीडित कुटुंबांना वाल्मीक कराडच्या गॅंगकडून धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

वाल्मीक कराड हा आत बसून सूत्र हलवत आहे का? असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर sp नवीन आणले. मात्र खालची यंत्रणा जुनीच आहे.त्यात अजूनही काही बदल झालेला नाही अनेक लोक प्रशासकीय यंत्रणेत तेच आहेत त्यांच्यात लवकरात लवकर बदल करा आणि देशमुख कुटुंबिंयाना न्याय द्या अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना दिली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख,धनंजय देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×