कार्यालयीन अधिक्षकासह दोघांनी फर्निचरचे देयक मंजुरीसाठी घेतली १ लाखांची लाच
Marathinews24.com
पुणे – ससूनच्या बै. जी . वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या फर्निचरच्या कामाचे देयक मंजूक करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायकाने १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांनाही १ लाखांची लाच स्वीकारताना बुधवारी महाविद्यालयाच्या आवारात पकडले.याप्रकरणी कार्यालयी अधीक्षक सुरेश विश्वनाथ बाेनवळे (वय ५३), वरिष्ठ सहायक जयंत पर्वत चौधरी (वय ४९) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
पुण्यात १० वर्षात पहिल्यांदाच खुणांचे प्रमाण घटले
तक्रारदार फर्निचर व्यावसायिक असुन २०२३ मध्ये त्यांनी २० लाख रुपयांचे फर्निचर महाविद्यालयास दिले होते. एकूण देयकापैकी १० लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी बोनावळे आणि चौधरी यांनी व्यावसायिकाकडे १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार देण्यात आल्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. चौकशीत बाेनवळे, चौधरी याने लाच मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या बाेनवळे आणि चाैधरी यांना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध रात्री उशीरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहे.