युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा खडकी येथे आयोजित

23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया; जनरल ड्युटी, तांत्रिक, ट्रेड्समन व खेळाडू पदांसाठी संधी

marathinews24.com

पुणे –  बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि खडकी, पुणे येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा 23 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

वाहन क्रमांक आरक्षणासाठी 11 फेब्रुवारीपासून फेसलेस सेवा सुरू – सविस्तर बातमी

या भरती मेळाव्यात अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (ट्रेड्समन – 10 वी व 8 वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अग्निवीर खेळाडू पदासाठी केवळ मुख्यालय बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, जनरल स्टाफ (क्रीडा) शाखेद्वारे प्रायोजित उमेदवारांनाच सहभागाची परवानगी असेल.

भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. 23 फेब्रुवारी 2026 अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्ग.

दि. 24 फेब्रुवारी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – शिख (मजहबी व रामदासी) व मुस्लिम, अग्निवीर (तांत्रिक) – अखिल भारतीय सर्व वर्ग (AIAC), अग्निवीर (ट्रेड्समन – १०वी व ८वी उत्तीर्ण) – एआयएसी, संगीतकार (खुला वर्ग), शेफ, ड्रेसर, स्टिवर्ड, सपोर्ट स्टाफ, वॉशरमन, हाऊस कीपर,मेस कीपर इत्यादी पदांसाठी

दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) – फुटबॉल, पोहणे, हॉकी, व्हॉलीबॉल, रोइंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, सेलिंग, कुस्ती, क्रॉस कंट्री, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग व जिम्नॅस्टिक्स (फक्त मुख्यालय बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, जनरल स्टाफ (क्रीडा)द्वारे प्रायोजित उमेदवारांसाठी).

खेळाडू उमेदवारांचे प्राथमिक मूल्यांकन दि. 16 फेब्रुवारी 2026 पासून जनरल स्टाफ (क्रीडा) शाखेमार्फत नियुक्त प्रिलिम बोर्ड ऑफ ऑफिसर्सद्वारे करण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी व शारीरिक मापन चाचणीसाठी केवळ शिफारस केलेल्या उमेदवारांनाच परवानगी दिली जाईल.

सर्व उमेदवारांसाठी प्रवेशद्वार दररोज सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत खुले राहील. सकाळी 8 वा. नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पात्र उमेदवारांची प्राथमिक तपासणी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, सॉफ्टवेअर नोंदणी आणि शारीरिक मापन चाचणी केली जाईल. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

अग्निपथ योजनेअंतर्गत सेवा अटी व भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.bsakirkee.org या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×