नातीकडूनच जबरी चोरीचा प्रयत्न; कर्वेनगरमधील घटना

नातीकडूनच जबरी चोरीचा प्रयत्न; कर्वेनगरमधील घटना

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सख्या भावाच्या नातीनेच ज्येष्ठ नागरिक असलेल्या आजी आत्याच्या घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार ३१ वर्षीय नातीविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तिला ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.

कौटुंबिक वादातून सलून व्यावसायिकाने केली आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कर्वेनगरमधील पिनाक पारीजात सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांच्यासोबत कोणी राहत नाही. दरम्यान, आरोपी ही त्यांच्या भावाची नात आहे. ती पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आली. तिने जेष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून, धक्काबुक्की करून त्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×