Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम

marathinews24.com

मुंबई – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आयोजित करण्यात आला आहे.

नागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – सविस्तर बातमी 

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक साहित्यनिर्मिती, अध्यात्मिक विचार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनावर अमीट ठसा उमटविला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यांच्या समतावादी, मानवतावादी आणि भक्तिमार्गाच्या विचारांचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक विचारांचा आणि संतपरंपरेतील योगदानाचा परिचय जनसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संतविचार, भक्तीपरंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन रसिकांना घडणार आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जनमानसात व्यापक ओळख निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि संतपरंपरेचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×