बालेवाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – Balewadi Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने चौघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना बालेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली. केरबा नामदेव शिंदे (वय ४७, रा. मधुबन सोसायटीसमोर, अष्टविनायक चौक, बालेवाडी) करण राजू कापरे (वय १९), गोविंद उत्तम नागरे (वय १७), कार्तिक राजू भाटकर (वय १४) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रतीक संतोष मानकर (वय २१, रा. परफेक्ट सोसायटीसमोर, बालेवाडी ) याला अटक केली आहे. याबाबत शिंदे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गॅरेज चालकावर वार करणारा अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मुलाच्या मित्रांसोबत आरोपी मानकर याचे वाद झाले होते. १४ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास बालेवाडीतील अष्टविनायक चौकातील सोसायटीसमोर आरोपी मानकर याने शिंदे यांचा मुलाचा मित्र करण कापरे, तसेच त्याच्याबरोबर दोन अल्पवयीन मित्रांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मानकर याने त्यांनी शिवीगाळ करुन धमकावले. (Balewadi Crime News) त्यांची भांडणे सुरू असताना तक्रारदार शिंदे तेथे गेले. त्या वेळी शिंदे यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला त्यांनी समजावून सांगितले. आरोपीने शिंदे, त्यांच्या मुलाचा मित्र करण यांच्यासह दोन अल्पवयीनांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात शिंदे यांच्यासह चौघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेला आरोपी मानकर याला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.






















