Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; २५ लाखांचा ऐवज चोरला

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

सिंहगड रोड, नांदेड-सिटी कोंढव्यात घटना

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सिंहगड रोड, कोंढवा नांदेड सिटी परिसरातील तीन फ्लॅट फोडत तब्बल २५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घटनांमधील चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी पहिल्या घटनेत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान घडला आहे.

पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

तक्रारदार आनंदनगर येथील शिवसागर रेसिडेन्सीत राहण्यास आहेत. दरम्यान, त्यांच्या घराची चावी चोरून किंवा बनवून त्याद्वारे घर उघडून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममधील ड्राव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा २१ लाख ११ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तर नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीएसके रोड धायरी येथे बंद फ्लॅट फोडून ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

एलईडीसह वायर चोरून नेले

कोंढव्यातील पुण्यधाम आश्रम परिसरातील डी. मार्ट रोडवर असलेल्या एका बांधकाम साईटवरील कार्यालयातून चोरट्यांनी ३ लाख ९२ हजार रुपयांचे एलईडी तसेच इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तन्मय पाल (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×