Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न,

पुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न

पुण्यातील हॉटेलमधील सिलेंडरमुळे लागली आग, कामगार ठार

marathinews24

मराठीन्यूज २४- पुणे : हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसगळती होउन लागलेल्या आगीत २४ वर्षीय कामगार ठार झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीची धनकवडीत आगीच्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. आगीची घटना रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास धनकवडी के के मार्वेâटनजीक साईबा हॉटेलमध्ये घडली आहे. संतोष (वय २४) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न,
पुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न,

धनकवडी परिसरातील के के मार्वेâटनजीक साईबा हॉटेल असून, त्याठिकाणी ३० मार्चला संध्याकाळी सव्वा चारला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. वर्दि मिळताच काञज व गंगाधाम अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी धाव घेत हॉटेलमध्ये अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. पाण्याचा मारा करत कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तेथील आग पुर्ण विझवत धोका दुर केला.

खड्ड्यातील पाण्यात शाळकरी मुलगा ठार- सविस्तर बातमी

शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही नुकसान झाले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतरञ पसरली नाही. आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळाले असून, दुध तापवित असताना वायूगळती झाल्यामुळे सिलेंडरमुळे आग लागली . त्याचवेळी संतोषला हॉटेलबाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हॉटेलमध्ये एकूणन आठपैकी तीन सिलेंडरमधून त्यापैंकी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. आगीमध्ये कामगाराचा मृत्यु झाला आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्टेशन ऑफीसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्‍यांनी प्राधान्य दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×