Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची उपमहापौरांची ग्वाही

क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची उपमहापौरांची ग्वाही

खेळाडूंच्या वतीने फुटबॉल विश्वचषकाची प्रतिकृती देऊन सन्मान

marathinews24.com

पुणे – पुणे शहराला उत्तम खेळाडूंची दैदीप्यमान परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली.

कौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंड – सविस्तर बातमी 

फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 निमित्त गेम ऑफ गोल एफसीसी अकादमीच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका सातत्याने घेतल्याबद्दल वाडेकर यांचा विश्वचषकाची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला. अकादमीचे प्रशिक्षक सुशील जोसेफ यांच्या हस्ते ही प्रतिकृती देण्यात आली.

यावेळी विठ्ठल गायकवाड, बाबासाहेब कांबळे, नवनीत सिंग गांधी, मनन त्रिवेदी, अशोक शेळके, बाळू सोरटे आदी मान्यवरांसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातून उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आपण कायम सतर्क राहू. विशेषतः खडकी, दापोडी, बोपोडी परिसराला फुटबॉल आणि हॉकी या खेळांची मोठी परंपरा आहे. या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या परिसरात सर्व सुविधांनी सुसज्ज स्टेडियम उभारत असल्याचेही वाडेकर यांनी यावेळी सांगितले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या दोन्ही संघांना त्यांनी पुणेकरांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या.

वाडेकर यांनी सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांच्या सहकार्याने खडकी परिसरात क्रीडा क्षेत्राचा मोठा विकास होईल, असा विश्वास जोसेफ यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×