Breking News
पुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूकपिंपरीतील सराइताकडून पिस्तूल जप्तपुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात महिलेचे दागिने चोरीलापुण्यात बेकायदा वास्तव्य करणारे ३ बांगलादेशी ताब्यात

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन

तीर्थक्षेत्र विकासाला चालना देण्याचा निर्धार

marathinews24.com

नाशिक – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान, चांदवड येथे देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्या भगिनी जेहलम जोशी व कन्या रश्मी जोशी उपस्थित होत्या. डॉ. गोऱ्हे यांनी रेणुका मातेच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

विश्वाला हेवा वाटेल, अशी शिवजयंती साजरी करणार-अमित गायकवाड – सविस्तर बातमी 

दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंदिर परिसराची पाहणी करत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी देवीला साडी, पुष्पहार व प्रसाद अर्पण करून ओटी भरत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “रेणुका माता आमचे कुलदैवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसरातील विकासकामांसाठी सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार माझ्या निधीतून ९ लाख रुपये देवस्थानाच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. रंगमहालाचे काम सुरू झाले असून ते लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास होऊन भाविकांना सुविधा मिळाव्यात आणि स्थानिकांना रोजगारनिर्मिती व्हावी, ही शासनाची भूमिका आहे.

सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकसह राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेक मंदिरांच्या विकासासाठी योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×