Breking News
Mission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्त

Diwali Faral Sale Pune 2026 : दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी ‘मराठमोळ्या चवींचा फराळ दिवाळीचा’ उपक्रम

Diwali Faral Sale Pune 2026

सनीज फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; दिवाळी फराळ विक्रीतून मिळणारा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

marathinews24.com

पुणे – Diwali Faral Sale Pune 2026 :दिवाळीचा आनंद सर्वांसोबत साजरा व्हावा आणि दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक बांधिलकीतून सनीज फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठमोळ्या चवींचा फराळ दिवाळीचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ४ आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील विविध १८ केंद्रांवर दिवाळी फराळ किटची विक्री करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ – सविस्तर बातमी 

या उपक्रमात शंकरपाळी, चकली, स्पेशल चिवडा, सोनपापडी आणि शेव अशा पाच पारंपरिक दिवाळी फराळाच्या पदार्थांचा समावेश असलेले तीन किलोचे विशेष किट केवळ ५०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या किटची प्रत्यक्ष किंमत १२०० रुपये असून, नागरिकांना माफक दरात दर्जेदार आणि स्वादिष्ट फराळ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, या खरेदीतून नागरिकांना आर्थिक बचतीचा लाभ मिळण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठीही आपला सामाजिक सहभाग नोंदवता येणार आहे.

विशेष म्हणजे, या फराळ विक्रीतून जमा होणारा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्येही या उपक्रमातून जमा झालेला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला होता. यंदाही ही सामाजिक मदतीची परंपरा कायम ठेवण्यात येत आहे. कै. आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, आयोजक सनी विनायक निम्हण यांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

फराळ विक्रीची केंद्रे : Diwali Faral Sale Pune 2026 सनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सोमेश्वरवाडी, पाषाण; नगरसेवक सनी विनायक निम्हण संपर्क कार्यालय, भाऊ पाटील रोड, बोपोडी; न्यू पासपोर्ट ऑफिस, बाणेर-पाषाण लिंक रोड; कॉसमॉस बँक समोर, औंध गाव; डी मार्ट समोर, औंध; सचिन मानवतकर जनसंपर्क कार्यालयाजवळ, जगदीश नगर; सिल्व्हर हाइट कॉर्नर, सानेवाडी; सद्गुरू जिम, पीएमसी शाळेजवळ, गोखलेनगर; डोंगर हॉल, वडारवाडी; ओम सुपर मार्केट चौक, मॉडेल कॉलनी; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर, खडकी बाजार; कमला नेहरू पार्क, प्रभात रोड; दास ऑटो गॅरेज, मुळा रोड, शिवाजीनगर; दत्त मंदिर, शिरोळे वस्ती, एफसी रोड; सोमेश्वर फाउंडेशन, जंगली महाराज रोड; विवेक प्रिंटर्स, पुलाची वाडी; सनी प्राईड बिल्डिंग, पुलाची वाडी आणि श्रेता चव्हाण जनसंपर्क कार्यालय, येरवडा.

दिनांक : ४ व ५ नोव्हेंबर २०२६
वेळ : दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी दिवाळीचा फराळ खरेदी करून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन आयोजक सनी विनायक निम्हण आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

‘प्रत्येकाची दिवाळी गोड करू… दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देऊ!’ हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×