Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Dr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कार

Dr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कार

१ लाखांहून अधिक नेत्रशस्त्रक्रिया; ६ लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार

marathinews24.com

पुणे – Dr Anil Dudhabhate Medical Award : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेतील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत मराठवाडा युवा मंचतर्फे यंदाचा प्रतिष्ठेचा वैद्यकीय पुरस्कार प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांना प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नेत्रसेवेतील बहुआयामी कार्याचा गौरव करण्यात आला.

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृती – सविस्तर बातमी

एम.बी.बी.एस., एम.एस., एफ.सी.पी.एस. या उच्च शैक्षणिक पात्रतेसोबत वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत डॉ. दुधभाते यांनी नेत्रसेवेच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी एक लाखांहून अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया केल्या असून, Dr Anil Dudhabhate Medical Award  सहा लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उपचारातून अनेक रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा दृष्टीचा प्रकाश आला आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांपर्यंत नेत्रसेवा पोहोचावी, या उद्देशाने त्यांनी एक हजारांहून अधिक मोफत नेत्रशिबिरांचे आयोजन केले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विविध नेत्रविकारांवरील उपचार तसेच अत्याधुनिक नेत्रसेवेबरोबरच नेत्रदान चळवळीला प्रोत्साहन देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरच्या माध्यमातून रुग्णकेंद्री नेत्रसेवेचा विस्तार करण्यात आला आहे. उपचारांसोबतच सर्वसामान्यांमध्ये नेत्र आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी ‘नेत्रकोष’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे मे महिन्यात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

वैद्यकीय कौशल्याला सेवाभावाची जोड आणि रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची किनार देणाऱ्या डॉ. दुधभाते यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे नेत्रसेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×