Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – तब्बल २८ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. तोटेवार यांची पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. बदलीनंतर त्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही रद्द करण्यात आला.

आरोपीला फाशी मिळेपर्यंत कुटूंबियासोबत राहणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक पदावरुन त्यांना निलंबित करण्यात येणार आहे, अश माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली. तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस होत्या. जमिनीच्या एका प्रकणातील तक्रार अर्ज त्यांच्याकडे चौकशीसाठी सोपविण्यात आला होता. या प्रकरणात तोटेवार यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये दिले होते. उर्वरित २८ लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली होती. लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला शनिवारी (२ मे) दुपारी बंडगार्डन रस्त्यावरील पंचतारांकित हाॅटेलजवळ बोलाविले होते. ही रक्कम स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ ) यांना पाठविले होते. चव्हाण हा तोटेवार यांच्या ओळखीचा आहे. तक्रारदाराकडून लाच घेताना चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले.

चौकशीत तोटेवार यांनी लाच घेण्यासाठी पाठविल्याचे उघड झाल्यानंतर तोटेवार यांच्यासह चव्हाण याला अटक करण्यात आली. तोेटेवार आणि चव्हाण यांना न्यायालायने सहा मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×