Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आरोपीला फाशी मिळेपर्यंत कुटूंबियासोबत राहणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यात ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी, पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

पीडितेच्या घरी जाऊन साधला संवाद

marathinews24.com

पुणे – नसरापूर गावात नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून खून केला आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सोमवारी (दि. ४) पीडितेच्या घरी गेले होते. त्यांनी मुलीच्या आई वडिलांची भेट घेत आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत कुटूंबीयासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल तर, मला सांगा मी तुमच्या घरी येईल असेही सांगताना आयुक्तांचे डोळे पाणावले होते.

खुनाचा प्रयत्नातील सराईत गजाआड;पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी

भोर तालुक्यातील नसरापूरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. सुटीसाठी पुण्यातून गावी आजीकडे गेलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीवर भिमराव कांबळे (वय ६५) गोठ्याकडे नेऊन अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात असून, आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे. १ मे रोजी घटना घडल्यानंतर, शनिवारी (दि.२) संतप्त नागरिकांनी नवले पूल परिसरात साडेचार तास आंदोलन केले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या वडिलांना तुमच्या मागण्या आम्ही नक्की पूर्ण करू असे प्रशासनाच्यावतीने आश्वासन दिले होते. दरम्यान, सोमवारी आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या आई-वडिलांना धीर देत, या प्रकरणासाठी लवकरच विषेश सरकारी वकील नियुक्त केला जाईल असेही सांगितले.

तिला गाय-वासरू आवडायचे

चिमुरडीला गोठ्यात ‘वासरू दाखवतो’ असे म्हणत नराधमाने तिला नेऊन अत्याचार केला. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी मुलीला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच गावी गायीला वासरू झाल्याने ती गाय आणि वासरू बघण्यासाठी गेली, मात्र तिचा घात झाल्याचे वडिलांनी आयुक्तांना सांगितले.

आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना

पीडितेचे कुटुंबिय अत्यंत दु:खात असून, दोन दिवस पीडितेच्या आई-वडिलांनी अन्नाचा घास खाल्ला नव्हता. पीडितेची आई चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून दिवस-रात्र रडत आहे. ही बाब पोलिस आयुक्तांना समजताच त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांची खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

आम्हाला पोलिसांकडून त्रास झाला नाही

पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावर पीडितेच्या कुटुंबियांनी व्हि़डिओद्वारे, नवले पुल परिसरात आंदोलन शांततेत चालू होते. मात्र, आंदोलनाची समाप्ती केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×