Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शेतकऱ्याकडून १ लाखांची लाच घेतली, वनरक्षक गोत्यात…

वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Marathinews24.com

पुणे – पाळीव जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्डयाप्रकरणी कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. सासवड परिसरातील जागेत शेतकऱ्याने खोदकाम करीत मुरघास पीक घेतले होते. याप्रकरणी आता लाच घेताना गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२) या वनरक्षकाला अटक केले आहे. याबाबत एका शेतकरी तरुणाने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी निर्डे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात गोविंद निर्डे वनरक्षक आहे. तक्रारदार तरुणाने पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तक्रारदाराने खड्डा बुजविला. त्यानंतर वनरक्षक निर्डेने याप्रकरणात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली.

तक्रारदाराने तडजोडीत १ लाख रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढल्यानंतर सासवडमधील वीर फाटा परिसरात सापळा लावण्यात आला. निर्डेने तक्रारदाराला १ लाख रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी बोलाविले. त्यानंतर तक्रारदार तरुणाकडून १ लाखांची लाच घेताना निर्डेला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, उपअधीक्षक भारती माेरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×