Breking News
पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात

कोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचे दागिने चोरीला

पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम

२४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल केली फिर्याद

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल १७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ३० ते ३१ मे कालावधीत कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. ३० ते ३१ मे कालावधीत कामानिमित्त महिला फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १७ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले. गावाहून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top