Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीला

बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

स्वारगेट पसिरातील घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेच्या हातातील १ लाख ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली कापून नेली. ही घटना २३ मे रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी वडगाव बुद्रूकमध्ये राहणार्‍या ७४ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवासात बेदम मारहाण करत तरुणाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वडगाव बुद्रूकमध्ये राहायला असून, कामानिमित्त २३ मे रोजी स्वारगेट परिसरात आल्या होत्या. काम संपल्यानंतर संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेटमधील नटराज हॉटेलजवळील बसस्थानकातून बसमध्ये प्रवेश करीत होत्या.

त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाख ५० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. काही वेळानंतर महिलेला हातात सोन्याची पाटली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार राउत तपास करीत आहेत.

पीएमपीएल बसप्रवासात दागिने चोरणारी टोळी सक्रिय

बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगेतून सोन्याचे बिस्कीट आणि दागिने असा ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ मे रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पुणे महानगरपालिका बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी नवी सांगवीत राहणार्‍या तरूणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

ही घटना २६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास गाडीतळ बसस्थानक ते हडपसर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी हडपसरमधील ससाणेनगरमध्ये राहणार्‍या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×