Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

प्रवासात बेदम मारहाण करीत तरूणाला लुटले

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

चौघांविरूद्ध गुन्हा, वडगाव बुद्रूक परिसरातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – गावाकडे जाण्यासाठी ट्रॅव्हर्ल्स बसस्टॉपपर्यंत खासगी मोटारीतून प्रवास करणार्‍या तरूणाला टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटले आहे. चोरट्यांनी त्याच्याकडील २ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३० मे रोजी रात्री बाराच्या सुमारास वडगाव बुद्रूक ते ससेवाडी प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी स्वरूप अक्षय कदम (वय २५, रा. नर्‍हेगाव, पुणे ) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वरूप कदम हे नर्‍हेगावात राहायला असून कामानिमित्त ते ३० मे रोजी रात्री बाराच्या सुमारास कोल्हापूरला जाण्यासाठी वडगाव बुद्रूक परिसरात थांबले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना ट्रॅव्हल्स थांबत असलेल्या ससेवाडी परिसरात सोडतो असे सांगून गाडीत बसविले. काही अंतरावर गाडीतील टोळक्याने स्वरूपला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना धमकावून २ हजारांची रोकड, कानातील सोन्याची बाळी असा ३५ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडून देत टोळके मोटारीतून पसार झाले आहे.

लिफ्टच्या बहाण्याने यापुवीही लुटमारीच्या घटना

रस्त्यालगत वाहनांची वाट पाहत थांबलेल्या नोकरदारासह चाकरमान्यांना रात्रीच्या सुमारास लिफ्टच्या बहाण्याने चोरट्यांनी लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः उपनगरातून प्रवास करणार्‍या तरूणांना चोरट्यांनी टारगेट केले असून, त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून लुटमार केली जात आहे. त्यामुळे प्रवासावेळी नागरिकांनी मौल्यवान ऐवज सोबत बाळगू नये, दिखाउपणासाठी अंगावरील सोने लुटमारीला कारणीभूत ठरत असल्याचमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून रात्रगस्तीला होणारी हाराकिरीमुळे चोरट्यांच्या फावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×